Sunday, 10 April 2011
मुंबईकर वि. पुणेकर
गेली अनेक वर्षे राजकारणामुळे मराठी माणसात फूट पडल्याची असंख्य उदाहरणं आपण पाहिली असतील. मात्र आता राजकारणाबरोबरच खेळाच्या मैदानावरही महाराष्ट्रातील मराठी जनता दोन गटात विभागली जाणार आहे.
यंदाच्या वर्षी आयपीएलच्या चौथ्या मोसमात मुंबईबरोबरच पुण्याच्या संघाचाही समावेश झाल्याने नक्की कोणाला सपोर्ट करायचा हा लाखमोलाचा प्रश्न मराठी मनाला पडला प्रश्न पडला आहे. यंदा प्रथमच पुण्याचा संघ आयपीएलमध्ये खेळत असून विश्वचषक स्पर्धेत भारताचा हिरो ठरलेला युवराज सिंग या संघाचे नेतृत्व करतोय. तर इकडे आपला लाडका सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा ध्वज डौलात फडकवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
साखळी फेरीत एक सोडून दोन वेळा मुंबई आणि पुण्याचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार असून दोन्ही संघांनी चांगली कामगिरी करत पुढे आगेकूच केल्यास तिथेही हे समोरासमोर येऊ शकतात.
२० एप्रिलला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर ४ मे ला नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर या दोन संघांमधील रंगतदार सामना पाहायला मिळेल.
या स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment