Wednesday, 6 April 2011
जयवर्धनेनेही पद सोडले
कुमार संगकाराने श्रीलंकन क्रिकेट संघाचे कप्तानपद सोडून २४ तासही उलटत नाहीत, तोच आता उपकर्णधार महेला जयवर्धने यानेही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय श्रीलंकन निवड समितीच्या सदस्यांनीही राजीनामा देण्याची तयारी दाखवल्याने लंकन क्रिकेटमध्ये सध्या मोठे फेरबदल होण्याची चिन्हं आहेत.
आधी श्रीलंकन संघाचा कर्णधार राहिलेल्या जयवर्धनेने २००९ साली कप्तानपद संगकाराकडे सोपवून उपकर्णधार राहणे पसंत केले होते. आता त्याने श्रीलंकन बोर्डाला राजीनाम्याचे पत्र पाठवले असून यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे श्रीलंका क्रिकेटचे चेयरमन डीएस डिसिल्व्हा यांनी सांगितले आहे.
तसेच अरविंदा डिसिल्व्हा अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय निवड समितीनेही राजीनामा देण्याची तयारी दाखवली असल्याचे वृत्त आहे.

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment