Friday, 8 April 2011
आयपीएलची रंगारंग सुरूवात
क्रिकेट विश्वचषकाचा फिव्हर उतरतो न उतरतो तोच आज देशात आयपीएलच्या महासंग्रामाला सुरूवात झाली असून आता पुढील ५१ दिवस पुन्हा एकदा भारतीय २०-२० च्या नशेत धुंद होताना दिसतील.
आज चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमनर आयपीएलचा उद्घाटन सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. असंख्य बॉलीवूड स्टार्सनीही या दिमाखदार सोहळ्यात आपला खास जलवा पेश केला. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीनेही आसमंत उजळून निघाले.
या उद्घाटन सोहळ्यानंतर आयपीएलच्या चौथ्या हंगामातील पहिल्या सामन्याला प्रारंभ झाला असून यात गौतम गंभीरचे कोलकाता नाइट रायडर्स आणि महेंद्रसिंग धोनीचे चेन्नई सुपर किंग्स एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
चेन्नईने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत नवोदित अनिरूद्ध श्रीकांतच्या (निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांतचा मुलगा) अर्धशतकाच्या जोरावर ४ गडी गमावून १५३ चा पल्ला गाठला आहे. यावेळी कोलकात्याच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा त्यांना चांगलाच फटका बसला. आता कोलकातासमोर हा सामना जिंकण्यासाठी १५४ चे लक्ष्य असून गौतम गंभीर, युसुफ पठाण यांसारख्या फलंदाजांचा समावेश असलेला कोलकाताचा संघ काय कमाल दाखवतो ते पाहावं लागेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment